सध्या सोयाबीनच्या भावामध्ये मोठे चढ-उतार आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना भीती आहे की सोयाबीनचे बाजार भाव वाढतील का कमी होतील. आंतरराष्ट्रीय दरामध्ये सोयाबीनचे भाव कमी जास्त होत राहतात त्यामुळे त्याचा थेट परिणाम हा सोयाबीनच्या बाजारभावावर होतो.
खाद्यतेलाच्या किमतीमध्ये सतत बदल होत राहतात त्यामुळे जागतिक सोयाबीनचे भाव वाढण्यासाठी राज्य शासनाने व केंद्र सरकारने यामध्ये मध्यस्थी करणे खूपच महत्त्वाचे आहे. जर केंद्र सरकारने व राज्य सरकारने यामध्ये हस्तक्षेप केला तरच शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ शकतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा यासाठी देखील शासनाने प्रोत्साहित करायला हवे
स्तरावर सोयाबीनचे उत्पादक कमी जास्त झाल्यामुळे विशेष करून अमेरिका आणि ब्राझील या देशांमध्ये सोयाबीन पिकासाठी असणारे प्रतिकूल वातावरण त्यामुळे उत्पादनामध्ये तो तुटवडा निर्माण झाला त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनावर दबाव निर्माण झाला आहे.
सध्या भारतामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये खूप मोठा दबाव निर्माण झालेला असून महाराष्ट्र व मध्य प्रदेश या ठिकाणी सोयाबीनला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत
सोयाबीनचे हे सध्याचे बाजार भाव काय दिवस असेच राहू शकतात असं तज्ञाचे देखील मत आहे सध्या राज्यामध्ये ज्या प्रकारे सोयाबीनचे उत्पादक आहे त्यामुळे सोयाबीनचे भाव स्थिर होण्यासाठी अजून थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे
महाराष्ट्रातील सोयबीन भाव
जिल्हा | जात | आवक | साधारण दर |
उदगीर | हायब्रीड | 2750 | 4540 |
कारंजा | हायब्रीड | 2500 | 4400 |
लोहा | हायब्रीड | 40 | 4400 |
तुळजापूर | हायब्रीड | 60 | 4500 |
मालेगाव | हायब्रीड | 250 | 4250 |
सोलापूर | हायब्रीड | 30 | 4550 |