Cotton Rate : अनेक शेतकऱ्यांनी कापसाचे भाव नंतर वाढतील या आशेने कापले कापूस तसेच ठेवले होते परंतु आता इतके दिवस ठेवूनही कापसाचे भाव वाढताना दिसत नाही त्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांनी नाईलाजाने कापूस विकायचे ठरवलेले आहे.
खरीप हंगाम लवकरच सुरू होत आहे. आणि त्याचबरोबर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी पाऊस चांगला होणार आहे त्यामुळे आता. शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता लवकरच खरीप हंगामाच्या पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होत आहे.
शेतकऱ्यांसाठी कापूस म्हणजेच पांढरे सोने याला खूपच मोठ्या प्रमाणात पसंती मिळते त्यामुळे खरीप अंगामध्ये सर्वात जास्त कापूस या पिकाची लागवड केली जाते. कापूस असे एकमेव पीक आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला नफा भेटतो. परंतु अनेक शेतकऱ्यांनी अजून मागील हंगामातील कापूस विकलेला नाही.
गेल्या अनेक वर्षापासून कापूस या पिकामध्ये बी ए बियाण्यांचा खर्च जास्त व पिकापासून मिळणारे उत्पन्न कमी होते त्यामुळे सध्या जगाचा पोशिंदा शेतकरी अडचणी सापडलेला आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी वेगळा मार्ग देखील निवडत आहेत.
गेल्या काही वर्षापासून कापूस या पिकांमध्ये शेतकऱ्यांना खूपच कमी फायदा होताना दिसत आहे परंतु नाईलाज म्हणून शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा कापसाची लागवड करावी लागते आणि जो मिळेल तो भाव घ्यावा लागतो.
जेव्हा कापूस वेचणी सुरू असते त्या काळामध्ये कापसाचे मागणी वाढते आणि दर कमी होतात त्यामुळे अनेक शेतकरी आपल्या कापूस पिकाची साठवण करून ठेवतात आणि त्याला नंतर जेव्हा कापसाला भाव मिळतो तेव्हा त्याला विकतात. कारण अनेक शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की जेव्हा कापसाचे मागणी खूपच जास्त असेल आणि पुरवठा देखील जास्त असेल तेव्हा कापसाला भाव मिळत नाही जेव्हा मागणी वाढेल आणि पुरवठा कमी असेल तेव्हा कापसाला भाव वाढतो.
परंतु यावर्षी मागील हंगामामध्ये असे काहीही झाल्याची दिसून येत नाही अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस साठवून ठेवला होता आणि त्यांना असे वाटले होते की पुढे चालून आपल्या कापसाला चांगल्या प्रकारे भाव मिळेल परंतु तसे होताना दिसत नाही त्यामुळे यावर्षी देखील शेतकऱ्यांच्या हाती निराशा आली आहे.